दूध डेअरींसाठी व्यावसायिक नियोजन

डेअरी व्यवसायाला निधी पुरवठा कसा करायला व तुमचा स्वतःचा डेअरी ब्रँड कसा तयार करायचा हे शिका

   Watch Promo

अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.

एका वर्षासाठी तज्ञांचे ऑनलाईन सहकार्य मिळवा.

दूध डेअरींसाठी व्यावसायिक नियोजनाची गरज असते का? एखाद्याला असे वाटू शकते की दूध डेअरी हा परंपरागत व्यवसाय आहे व त्याचे व्यावसायिक दृष्टिकोनातून मूल्यमापन करायची काहीच गरज नाही. हे खरे आहे. लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या दूध-दुभत्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या शेतावर दुभती जनावरे पाळतात. ते कदाचित त्यांच्या शेताचा व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करत नसतील. मात्र जे लोक दूध विकण्यासाठी व आपले उत्पन्न वाढविण्यासाठी दुभती जनावरे पाळतात त्यांनी व्यवसायाचा प्रत्येक पैलू समजून घेतला पाहिजे.

दूध डेअरींच्या व्यावसायिक नियोजनावरील या अभ्यासक्रमामुळे तुम्हाला दूध डेअरीचा व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करता येईल व तुमच्या डेअरीचे तटस्थपणे मूल्यमापन करता येईल. यासाठी आम्ही “फार्म चेक” नावाचे मोफत टूल तयार केले आहे ज्यामुळे तुम्हाला विविध निकषांवर तुमच्या डेअरीची कामगिरी कशी आहे याचा एक तयार अहवाल मिळू शकेल. तुम्ही जेव्हा नवीन दूध डेअरी सुरू करता, तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे नियोजन करावे लागते व खर्चाची तजवीज करावी लागते. म्हणूनच तुम्ही या व्यवसायातून नफा होईल का हे समजून घेतले पाहिजे. व्यावसायिक नियोजनामुळे तुम्हाला या तसेच इतरही बऱ्याच गोष्टी जाणून घेता येतात.

हुशार डेअरी व्यावसायिक त्यांच्या दुधाला उत्तम दर मिळावा यासाठी नेमके काय करतात? ते त्यांच्या डेअरीचे व्यवस्थापन कसे करतात व ते त्यांच्या दुधाची विक्री कशी करतात? तुम्ही तुमच्या उत्पादनांचे कल्पकतेने आकर्षक पॅकिंग कसे करू शकता व हुशार शेतकरी इतर कोणकोणती उप-उत्पादने घेतात? या अभ्यासक्रमामध्ये विविध यशस्वी डेअरी उद्योगांच्या उदाहरणांमधून अशा काही प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत.

तुमच्या दूध डेअरी व्यवसायासाठी स्वतःच्या पैशातून किंवा कर्जाद्वारे पैसा उभा करणे महत्त्वाचा भाग आहे. हा अभ्यासक्रम तुम्हाला दूध डेअरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या कर्जपुरवठा योजना उपलब्ध आहेत व अनुदान मिळू शकते याविषयी सविस्तर माहिती देतो. व्यावसायिक नियोजनाविषयीचा हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला दूध डेअरी व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी त्याचे अर्थकारण व्यवस्थित समजू शकेल.

आपल्या प्रशिक्षकांना भेटा


Your Instructor


डॉ. मनिषा दिनेश भोसले
डॉ. मनिषा दिनेश भोसले

डॉ. मनिषा दिनेश भोसले यांना MBA व MCAच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा दहापेक्षा अधिक वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे B.Sc., B.Ed., MCM, MBA व Phd असे शिक्षण झाले आहे. त्यांनी सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथून डॉक्टरेट मिळवली आहे. त्या पशुपालन उद्योगातील अतिशय यशस्वी व्यवस्थापन व्यावसायिक असून त्यांनी लाईव्हस्टॉक इन्स्टिट्यूट फॉर नॉलेज अँड एक्सलंस (एलआयकेई) नावाची संस्था सुरू केली आहे. ही संस्था भारतामध्ये पशुपालन उद्योगात काम करणाऱ्या कंपन्यांशी संवाद साधून त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करते. त्यांनी आत्तापर्यंत संपूर्ण भारतात पशुखाद्य निर्मिती उद्योगातील प्रक्रियेत होणारा तोटा, पशुखाद्य निर्मिती उद्योगातील विक्री चमूला प्रशिक्षण यासारख्या विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. चारा लागवडीविषयी जागरुकता वाढविण्यासाठी, त्यांनी पाच वेगवेगळ्या राज्यांमध्ये “फूडर यात्रा” आयोजित केली होती.

शेतकऱ्यांची जीवनमान सुधआरणे व ग्रामीण तरुणांना अर्थपूर्ण रोजगार उपलब्ध करून देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्या सध्या स्वदेश फाउंडेशन व पीपल एंपॉवरमेंट मूव्हमेंटला लघू कुक्कुटपालन, शेळी व दूध डेअरी व्यवसायांना चालना देण्यासाठी मदत करत आहेत. त्या पर्यावरण व वन्यजीवन संवर्धनासाठी सोसायटी फॉर वाईल्डलाईफ कंझर्व्हेशन, एज्यूकेशन अँड रिसर्च (वाईल्ड-सीईआर) या संस्थेसोबतही सक्रियपणे काम करत आहेत.


या कोर्समधून आपण काय शिकाल?

हा कोर्स शिकून घेण्यामागे असणारे उद्दिष्ट जाणून घेण्याकरिता हा छोटा विडिओ पहा


हा कोर्स आपल्याला कशी मदत करू शकेल?

तुम्हाला नवीन दूध डेअरी सुरू करायची असेल किंवा तुमच्या सध्याच्या दूध डेअरीचा विस्तार करायचा असेल तर, या अभ्यासक्रमामुळे तुम्हाला एक व्यवसाय योजना तयार करायला मदत होईल. या अभ्यासक्रमामध्ये स्वतःच व्यवसाय योजना कशी तयार करायची हे सविस्तरपणे समजून सांगण्यात आले आहे. तुम्हाला यामध्ये व्यवसाय योजनेचे नमुने देण्यात आले आहेत ज्यामुळे तुम्हाला कर्जपुरवठादारांसमोर तुमची विश्वसनीयता वाढेल अशा व्यवसाय योजना तयार करता येतील.

तुम्हाला ‘फार्म चेक’ नावाचे मोफत टूल वापरून तुमच्या दूध डेअरीच्या समस्या शोधता येतील. या टूलमध्ये तुम्हाला तुमच्या दूध डेअरीच्या व्यवस्थापनाशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. तुम्हाला तुमच्या दूध डेअरीच्या मूल्यमापनाचे गुण मिळतील व कोणत्या योग्य प्रक्रियांचे पालन केले पाहिजे हे सांगितले जाईल. तुम्ही आमच्या टूलकडून मिळाल्या प्रतिक्रियेचा वापर करून तुमच्या दूध डेअरीत सुधारणा करू शकता.

तुमच्या दूध डेअरीचे व्यवस्थापन करताना तुम्हाला डेअरीच्या अर्थकारणासंबंधी काही महत्त्वाच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागेल. तुम्ही किती जनावरे ठेवावीत व तुम्हाला तुमच्या दूध डेअरीतून नियमित मासिक उत्पन्न कसे मिळवता येईल याची उत्तरे तुम्हाला कदाचित हवी असतील. या अभ्यासक्रमामुळे तुम्हाला जनावरांच्या गर्भधारणेचा कालावधी व त्यांच्या आरोग्य समस्या वेळीच समजल्या नाहीत तर त्याचा आर्थिक परिणाम काय होतो हे समजेल. यामुळे तुम्हाला अशा सर्व गोष्टींचे नियोजन करायला मदत होईल.

या अभ्यासक्रमामुळे तुम्हाला उत्पन्न वाढण्यासाठी तुमच्या दुधाची व जोडउत्पादनांची विक्री कशी करायची याची सविस्तर माहिती मिळेल. यातून तुम्हाला सशक्त फायदेशीर डेअरी ब्रँड कसे घडवले जातात याचे मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला दूध डेअरी सुरू करण्यासाठी किंवा सध्याच्या दूध डेअरीचा विस्तार करण्यासाठी कर्ज कसे मिळवायचे हेदेखील शिकता येईल.

ऑनलाईन अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळवा

 

"आपल्या करिअरच्या संधी वाढवा"

Course Curriculum


  दूध डेअरींसाठी व्यावसायिक नियोजन
Available in days
days after you enroll
  नफासाठी आपल्या फार्मच्या ऑपरेशन्सचे व्यवस्थापन
Available in days
days after you enroll


तुम्हाला दूध डेअरींसाठी व्यवसाय नियोजनावरील हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पुढील गोष्टी करता येतील:

1. कर्ज मिळवण्यासाठी व्यवसाय योजना कशी तयार केली जाते हे समजून घेणे

2. “फार्म चेक” टूल वापरून तुमच्या दूध डेअरीची परिस्थिती जाणून घेणे

3. तुम्ही तुमच्या दूध डेअरीमध्ये किती जनावरे ठेवावीत हे जाणून घेणे

4. तुमच्या दूध डेअरीचा नफा व तोटा मोजणे

5. तुमचा स्वतःचा डेअरी ब्रँड तयार करण्याच्या दिशेने पावले उचलणे व उत्पन्न वाढविणे

6. तुमच्या दूध डेअरीकरता कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करणे

अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू.सवलतीसह ६०० रू.

Frequently Asked Questions


हा कोर्स केव्हा सुरु होईल आणि केव्हा संपेल?
आपण नोंदणी करता तेव्हा कोर्स सुरू होतो आणि एक वर्षानंतर संपतो. हा एक स्वयंपूर्ण ऑनलाइन कोर्स आहे - या कालावधीत हा कोर्स कधी सुरु करायचा आणि कधी संपवायचा हे आपण ठरवा.
हा कोर्स मला किती कालावधीपर्यंत उपलब्ध असेल?
एका वर्षासाठी. एकदा कोर्ससाठी आपल्या नावाची नोंदणी केल्यानंतर हा कोर्स आपल्यासाठी वर्षभर उपलब्ध असेल - आपल्याजवळ असणाऱ्या कोणत्याही डिवाइसच्या माध्यमातून.
मी प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकतो का?
या कोर्सच्या माध्यमातून आमचा आपणास सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक व्हिडिओसोबत असणाऱ्या कंमेंट विभाग माध्यमातून आपण सदैव प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकता. या कोर्समध्ये प्रशिक्षक आपल्या शंकांचे निरसन करण्यास नेहमी उपलब्ध असतील.
मला जर इतर समस्या असतील तर?
कोर्सच्या पूर्ण वर्षभराच्या कालावधीत, आमचा आपणास नेहमीच पाठिंबा राहील. आपणास कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आम्हाला [email protected] या पत्त्यावर लिहा.आम्हास जेवढ्या तत्परतेने शक्य असेल तेवढ्या जलद आम्ही आपणास प्रतिसाद देऊ.
हा कोर्स कोणासाठी लागू आहे? हा कोर्स मिळविण्यासाठी मला काही पात्रतेची आवश्यकता आहे का?
हा अभ्यासक्रम दूध उत्पादक ,विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक तसेच नवउद्योजक ज्यांना नवीन गोठा चालू करायचा आहे किंवा आपल्या जुन्या गोठ्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत अशा सर्वांसाठी फायद्याचा आहे .आमचे तंत्रज्ञानाचे व्यासपीठ वेगवेगळ्या संस्था जसे एनजीओ, कंपन्या व इतर संस्था मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणासाठी आणि विकासासाठी वापरू शकतात. आपल्याला हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता असण्याचे बंधन नाही. आमचा व्हिडिओ वर आधारित हा अभ्यासक्रम अशाप्रकारे बनवला आहे की कोणालाही सहज शिकता येईल व तांत्रिक पद्धती आपल्या गोठ्यावर राबवता येतील.

अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.